राघोजी भांगरे (Raghoji Bhangare)
महादेव कोळी आद्य आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे, राजे मुकणे हे ह्या जमातीतील नावाजलेल्या व्यक्ती आहेत. वसतीस्थाने महादेव कोळी ही आदिवासी जमात मुळात सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या दर्याखोर्यात रहात असे.. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात यांची मोठी वस्ती आहे. हे भीमाशंकरच्या डोंगरदर्यांत व पालघर जिल्ह्यातील मोखाडा व जव्हार या भागात टोळ्या-टोळ्यांनी राहतात. महादेव कोळी समाज हा सह्याद्रीच्या कुशीत पुणे ते मुळशीपर्यंत व पुणे ते त्रिंबकपर्यंत आढळतो. जव्हारलाही वस्ती आहे. बालाघाट ऊर्फ महादेव डोंगरात महादेव कोळ्यांचे मूळ वसतिस्थान असावे, असे परंपरा सांगते. अहमदनगर जिल्ह्यातही महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आढळतो.मराठवाड्यात नांदेड,लातूर,परभणी,जालना, औरंगाबद तसेच पूर्ण मराठवाडाभर व विदर्भातही कोळी महादेव समाज पठारी भागात राहतात. महादेव कोळी हे महादेवाचे पूजक असल्यामुळे त्यांना महादेव कोळी म्हणतात. बाह्य आक्रमणामुळे हे आदिवासी शहराकडे येण्याऐवजी पुन्हा डोंगरदर्यांत ढकलले जात आहेत.. देवदेवता महादेव कोळ्यांची गोत्रनावे व कुळांची नावे अनेक आहेत. खंडोबा कोळ्यांचे दैवत आहेत. परंतु ...