Posts

Showing posts from December, 2017

Shri Ganesh Banner

Image

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ

Ajay Bhangae १] *दत्त* : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चय करूया.. २] *अवधूत* : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण ‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’ ३] *दिगंबर* : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकवा….’ *...